बालभारतीच्या अभ्यासक्रमातील बदल रद्द करा : छात्रभारतीची मागणी


वेब टीम : पुणे
आज छात्रभारती विद्यार्थी संघटनेने बालभारती विरोधात अभ्यासक्रम बदलाच्या निषेधार्थ चुकीचा अभ्यासक्रम रद्द करावा ह्या मागणीस्तव निवेदन देऊन घोषणाबाजी करण्यात आली.

बालभारतीने इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात गणित हा विषय सोपा करण्याच्या नावाखाली अनेक बदल केले आहेत. हा बदल सरसकट लागू करण्यापूर्वी  प्रायोगिक तत्वावर वापरून तो वैज्ञानिक पद्धतीने तपासून पहिला गेला नाही. व्यवहारातील नावांचे बदल हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावहारिक अशा सर्व बाजूंना व्यापणारा मुद्दा आहे. त्याचा अभ्यास करणे, पथदर्शी प्रकल्प करून पाहणे, समाजातील सर्व घटकांशी चर्चा करणे, भाषातज्ञांची मते घेणे, शिक्षकांना विश्वासात घेणे यातलं काही न करता तो पाठ्यपुस्तकातून रेटला आहे. ‘आपण काहीही करू शकतो’ असा लोकशाहीविरोधी खाक्या यामागे दिसतो. लाखो मुलांच्या आयुष्यात असा अचानक बदल करण्याचा अधिकार बालभारतीला कोणी दिला? सरकारनेही या निर्णयाचे स्वागत करून संगनमताने हा बदल केला कि काय अशी शंका येते.

अभ्यासक्रमात अचानक केलेल्या या चुकीच्या बदलांचा छात्रभारती विद्यार्थी संघटनेने आज बालभारतीच्या सेनापती बापट रोड या कार्यालयाला निवेदन देऊन निषेध केला. एकतर बालभारतीचा आपल्याच शिकवण्यावर विश्वास नाही, किंवा दुसरीचे पाठ्यपुस्तक लिहीणाऱ्यांना पहिलीत काय शिकविले आहे हे माहित नाही असं दुसरीचा अभ्यासक्रम बदलून बालभारतीने सिद्ध केलंय. बालभारतीने त्वरीत हे बदल रद्द करून अभ्यासक्रम पूर्ववत करावेत. अन्यथा छात्रभारती त्याविरोधात राज्यव्यापी आंदोलन उभारेल असा इशारा यावेळी राज्यसदस्य सुरज दाभाडे आणि पुणे जिल्हाध्यक्ष तुकाराम डोईफोडे यांनी दिला. यावेळी पुणे विद्यापीठ संघटक प्रविण गुंजाळ, किरण भांगे, समृद्धी जाधव. अक्षय अरनाळे, निवृत्ती पारसे, नागनाथ साळवे, अक्षय शेळके इ. कार्यकर्ते उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates