सहा लाखांचा गुटखा जप्त


DNALive24 :वेब टीम,अहमदनगर
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक औताडे यांनी जामखेड येथील नान्नज येथून एका घरातून तब्बल ६ लाख १०हजार ६५० रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी अमजद निजाम पठाण (रा.नान्नज ता.जामखेड) हा पोलिसांच्या कारवाई दरम्यान पसार झाला आहे.

याबाबत सविस्तर असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक औताडे यांना अमजद निजाम पठाण (रा.नान्नज ता.जामखेड) याने आपल्या घरात चोरीचा मुद्देमाल लपवून ठेवला असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने दिली.

त्या अनुषंगाने औताडे यांनी त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोहेकॉ.सुनील चव्हाण, पोहेकॉ.फकिर शेख, चालक पोहेकॉ.संभाजी कोतकर, पोहेकॉ.संदीप दरंदले व रोहीत मिसाळ आदींच्या पथकाने खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अमजद पठाण याच्या घराची झडती घेतली असता., त्याने आपल्या घरात लपवून ठेवलेला ६ लाख १० हजार ६५० रूपये किमतीचा महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागताच आरोपी अमजद पठाण हा पळून गेला. पोलिसांनी जप्त केलेला सर्व मुद्देमाल जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक ईशु सिंधु, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सातव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates