किरण जगताप हत्या प्रकरण; आरोपींच्या मुसक्या आवळल्या


DNALive24 : वेब न्यूज, अहमदनगर
नगरमधील किरण उद्धव जगताप यांच्या हत्याप्रकरणीतील फरार आरोपी कोंढवा, पुणे येथून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यश आले आहे. शेख फैजान अब्दुल रौफ उर्फ फैजान बाबासाहेब जहागीरदार (वय26), शेख अराफत अब्दुल रौफ उर्फ अराफत बाबासाहब जहागीरदार (वय 24, दोघे रा.जूनाबाजार, भिस्तगल्ली, नगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या सदर गुन्ह्यातील आरोपींची स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.गोकुळ औताडे यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांना आरोपी फैजान जहागीरदार हा त्याचे साथीदारांसह कोंढवा, पुणे परिसरात लपवून बसलेला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई सचिन खामगळ, पोहेकॉ भाऊसाहेब काळे, मोहन गाजरे, विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, पोना संदीप घोडके, संदीप चव्हाण, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, चालक बाळासाहेब भोपळे यांच्या पथकाने सदर आरोपींचा शोध कोंढवा, पुणे येथे जाऊन करीत आरोपींना अटक केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post