४८ तासांमध्ये मान्सून केरळात होणार दाखल


DNALive24 : वेब टीम, मुंबई
येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर पुढच्या आठवडाभरात तो राज्यातही दाखल होईल. असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थीती निर्माण झालेली असल्याने बळीराजासह सर्वचजण पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, यंदाचा मान्सून हा कमजोर राहिल असे भाकीत हवामान तज्ज्ञांनी वर्तवले आहे.

हवामानाचा पूर्वानुमान वर्तवणारी संस्था स्कायमेटचे वैज्ञानिक समर चौधरी यांनी सांगितले की, येत्या ४८ तासांत केरळमध्ये मान्सून पोहोचण्याची आशा आहे. मात्र, यंदा मान्सूनचा जोर काहीसा कमजोर राहणार आहे.

दिल्ली आणि आजूबाजूच्या भागात मान्सून सर्वसाधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात येतो. तर महाराष्ट्रात तो ७ जूनपर्यंत दाखल होतो. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates