पाण्याअभावी वन्यपशुपक्षांचे हाल; निसर्गप्रेमी करताहेत मदत


DNALive24 : नगर
अतिशय प्रखर असा उन्हाळा व कोरडे पडलेले पाणीसाठे अशा परिस्थितीला सपुर्ण अहमदनगर जिल्हा तोंड देत आहे.या दुष्काळ सदृश परिस्थितीत सर्वात जास्त हाल होत आहेत ते वन्य पशुपक्षांचे पाण्याअभावी या वन्यपशुपक्षांना उष्माघाताला सामोरे जावे लागत आहे.जे वन्यपशु घोटभर पाण्यासाठी मनुष्यवस्तीकडे येण्याचे धाडस करत आहेत ते विविध अपघातांत सापडत आहेत.

मांडवे ता.पाथर्डी येथे पाण्याच्या शोधात व्याकुळ झालेली एक हरिणी आपल्या नुकत्याच जन्मलेल्या पाडसासोबत भटकट आली. तिला पाणी तर सापडले नाहीच पण गावातील मोकाट कुञ्यांच्या टोळीने त्या दोहोंच्या तोंडचे पाणीही पळविले.हरीणीने पिल्लाला वाचविण्याचा खुप प्रयत्न केला पण कुञ्यांची संख्या जास्त असल्याने हतबल झालेल्या दोहोंची ताटातुट झाली ती कायमचीच..! कुञ्यांनी असहाय झालेल्या पाडसाला ठिकठिकाणी चावा घ्यायला सुरूवात केली व ओरबाडुन झुडुपांमध्ये नेण्याच्या प्रयत्नात असतानाच गावातील निसर्गप्रेमी शेतकरी श्री. लक्ष्मण शिंदे यांनी हा सर्व प्रकार पाहिला कसलाही वेळ न दवडता दगडगोट्यांच्या सहाय्याने त्यांनी कुञ्यांना पिटाळुन लावले व त्या थरथरणारया रक्ताने माखलेल्या पिलाला अलगद उचलुन पाणी पाजले.गावातील निसर्गप्रेमी  संघटनेचे जिल्हा संघटक श्री.संदिप राठोड सरांना तातडीने कळविले संदिप सरांनीही वेळ न घालवता हे पाडस आपल्या गाडीतुन त्वरीत भिंगार येथील श्री.जयराम सातपुते यांच्याकडे आणले.तिथे प्रथमोपचार तज्ञ श्री.रूषीकेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाने औषधोपचार करून पुढील उपचारार्थ पिपल फाॅर अॅनिमल संस्थेच्या डाॅ.सुधाकर गीते,श्री.लक्ष्मण साखरे व स्वप्नील साखरे यांच्याकडे सुपुर्त केले.

अहमदनगर जिल्हानिसर्गप्रेमी संघटना २००३ पासुन जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र चालवत असुन विविध उपक्रम व जखमी वन्य पशुपक्षांसाठी हेल्पलाईन सुद्धा राबविते.या उन्हाळ्यात या संघटनेमार्फत लोकवर्गणीतुन जिल्ह्यात ठिकठिकाणी नवीन पाणवठे बांधुन ते सुनियोजनबद्ध भरण्याचे कार्यही सातत्यपुर्वक केले गेले आहे.तरीही जिल्हाभरात पाणीटंचाईमुळे अनेक पशुपक्षांना अपघातांना सामोरे जावे लागले.या उन्हाळ्यात एप्रिल व मे अशा फक्त दोनच महिण्यांच्या कालावधीत संस्थेत दाखल झालेल्या ५ पैकी ३ हरणांवर व ३ पैकी २ उदमांजरांवर यशस्वी उपचार करून निसर्गात मुक्त केले. तर सुमारे २५ पेक्षा अधिक विविध प्रजातींच्या पक्षांवरही उपचार केले असल्याची माहिती संस्थापक श्री.जयराम सातपुते यांनी दिली.या निसर्गकार्याच्या संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने हातभार लावणे आज काळाची नितांत गरज झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post