पुण्यात भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू, ४ लहान मुलांचा समावेश


वेब टीम : पुणे
कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यु झाला असून २ जणांना जिवंत काढण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. मृतांमध्ये ११ पुरुष, ३ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे.

यातील मृत्युंची नावे : आलोक शर्मा २८, मोहन शर्मा वय २०, अजय शर्मा वय १९, अभंग शर्मा १९, रवी शर्मा १९, लक्ष्मीकांत सहानी ३३, अवधेत सिंह ३२, सुनिल सिंग ३५, ओवीदास ६, सोनाली दास २ , विमा दास २८, संगीता देवी २६ अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. हे सर्व बिहार येथील मुळचे राहणारे आहेत.

ही इमारत उंचावर असून तिच्या संरक्षक भिंतीच्या खालच्या बाजुला खड्ड्यासारखी जमीन आहे. त्या ठिकाणी पत्र्याचे शेड बनविण्यात आले होते. त्याठिकाणी ही दुर्घटना घडली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates