बलात्कारी आरोपीला एसपींनी घातल्या गोळ्या


वेब टीम : रायपूर
रामपूरमध्ये गेल्या महिन्यात सहा मे  रोजी एका सहा वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करत हत्या करण्यात आली होती. या घटनेतील फरार आरोपीला झालेल्या पकडताना झालेल्या चकमकीत रामपूरच्या पोलीस अधीक्षकांनी दोन्ही पायावर गोळ्या घालत पकडले आहे. आरोपीला गोळ्या घालत पकडल्यानंतर एसपी अजय पाल शर्मा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान यानंतर जखमी आरोपी नाजिलला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काय आहे प्रकरण
रामपूरमधील एका सहा वर्षाच्या चिमुरडीचे सहा मे रोजी अपहरण झाले होते. अपहरण करणाऱ्या नाजिलने त्या मुलीची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणामध्ये सिव्हील लाइन पोलीस मागील दीड महिन्यापासून नाजिलच्या शोधात होते. या दरम्यान या चिमुरडीचा मृतदेह आढळून आल्याने पोलीसानाच्या कार्यप्रणालीवर टीका केली जात होती. यानंतर एसपी अजय पाल शर्मा यांनी नाजिलला शोधण्यासाठी काही पथकं नियुक्त केली होती.

अशी झाली धरपकड
आरोपीला पकडताना पोलिसांना एन्काउंटर करावा लागला. पोलिसांनी आरोपी पकडण्यासाठी ट्रेस केले. मात्र यावेळी आरोपी आणि पोलिसांमध्ये चांगलीच धरपकड झाली. यावेळी एसपी अजय पाल शर्मा यांनी नाजिलच्या दोन्ही पायाच्या गुडघ्यांवर गोळ्या झाडल्या आणि त्याला ताब्यात घेतले.

7 मे रोजी दाखल केली होती तक्रार -अजय पाल शर्मा
या घटनेच्या संदर्भात सात मे रोजी रामपूर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपास करत असताना पोलिसांना या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यानंतर आरोपीचा ट्रेस करत पोलिसांनी त्याला शोधले मात्र यावेळी पोलीस आणि आरोपीमध्ये जोरदार चकमक झाली. यावेळी आरोपीच्या दोन्ही पायांवर गोळ्या मारल्या आणि त्याला अटक केल्याचे अजय पाल शर्मा यांनी सांगितले.

अजय पाल यांच्यावर सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव
या प्रकरणी आरोपीवर गोळ्या झाडत त्याला पडकणारे एसपी अजय पाल यांच्यावर स्थानिक लोकांसह देशभरातून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामुळे मुली आणि महिलांकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांवर आणि दुष्कृत्य करणाऱ्यांवर जरब बसेल, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post