टीम इंडिया अवतरणार भगव्या जर्सीत, बीसीसीआयकडून फोटो शेअर


वेब टीम : मुंबई
भारतीय संघ इंग्लंडसोबत होणाऱ्या सामन्यात भगव्या जर्सीत अवतरनार आहे. बीसीसीआयने ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यासोबतच नव्या जर्सीचा फोटोही शेअर केला आहे. मागील अनेक दिवसांपासून या जर्सीची चर्चा होती. अखेर टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भगव्या जर्सीत खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे.भारतीय संघ भगव्या जर्सीत खेळणार असल्याची चर्चा रंगताच याला राजकीय रंगही देण्यात आला. तर काहींनी याचे समर्थनही केले. भारतीय संघाची नवी जर्सी भगव्या रंगात आहे. या जर्सीच्या मागील बाजूस पूर्णपणे भगवा रंग आहे.


भारताचा पुढील सामना 30 जूनला इंग्लंडसोबत होईल, त्यानंतर 2 जुलैला भारत विरूद्ध बांगलादेश आणि 6 जुलैला भारत विरूद्ध श्रीलंका सामना रंगणार आहे. गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताला पहिल्या स्थानावर जाण्याची संधी आहे. अंतिम सामन्यानंतर भारत पहिल्या स्थानी असल्यास चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघासोबत भारताचा सेमीफायनल होईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post