वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करून दमदाटी, नवरा - बायकोला एक वर्ष सक्तमजुरी


वेब टीम : अहमदनगर
अविनाश सुरेश पाटील, शर्मिला  अविनाश पाटील ( दोघे रा. आनंद ऋषी मार्ग मार्केट यार्ड अहमदनगर यांनी महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश प्रवीण चतुर यांनी भा.द.वि.का.क 353,504,506,सह 34 अन्वये दोषी धरून दोन्ही आरोपींना प्रत्येक कलमास 1वर्षे सक्तमजुरी व प्रत्येक कलमास 1हजार रुपये दंड अशा एकूण 6हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.


सदर गुन्ह्याची चौकशी होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले सदर खटला हा जिल्हा न्यायाधीश प्रवीण चतुर यांच्या न्यायालयात चालला सदर सत्र खटल्यामध्ये महिला पोलीस वसुधा किसन भगत, सहा. फौजदार सुभाष नानाजी वाघेला, पो.हे.काँ.शंकर कान्हू आहेर, तपासी अधिकारी यांच्या साक्षी सरकार पक्षातर्फे नोंदविण्यात आल्या बचाव पक्षातर्फे राजेंद्र रसिकलाल भंडारी भिंगार वाला चौक पान शॉप असे साक्षीदार तपासण्यात आले

जिल्हा न्यायाधीश प्रवीण चतुर यांनी न्यायालयासमोर आलेला पुरावा साक्षीदाराच्या साक्षी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अविनाश सुरेश पाटील व शर्मिला अविनाश पाटील यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश प्रवीण चतुर यांनी आरोपी भा.द.वि.का.क.353,504,506 सह 34 अन्वये दोषी धरून दोन्ही आरोपीस प्रत्येक अल्मास कलमास एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येक कलमास एक हजार रुपये दंड अशा एकूण 6000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदर खटल्यांमध्ये सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मंगेश दिवाने यांनी कामकाज पाहिले व त्यांना पहरवी अधिकारी हे.काँ. राजेंद्र माळी यांनी सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post