आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा रविवारी नगरमध्ये


वेब टीम :  अहमदनगर
शिवसेनेच्या युवा सेनेने आता नवा महाराष्ट्र घडवायचा असल्यानेच जन आशिर्वाद यात्रा सुरु केली. ती यात्रा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यात  दि.21 रोजी जिल्हयात येणार आहे.   दि.22 रोजी नगर येथे त्यानिमित्ताने माऊली संकुल येथे युवा सेनेचे ठाकरे हे युवकांशी संवाद साधणार आहे. यावेळी नगर शहरात युवकांना रोजगार मिळावा, यासाठी नवीन उद्योग येण्यासाठी प्रयत्न करावेत, याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत युवा सेनेचे विक्रम राठोड यांनी दिली.यावेळी जिल्हा प्रमुख रविंद्र वाकळे, शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर, सुमित घेंड, कुलकर्णी, स्वप्नील ठोसर, अक्षय नागापुरे आदीसह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दि.21 ला पारनेर तर 22 ला नगर शहर।जनसंवाद यात्रेचे स्वागत पारनेर येथे होणार आहे. आमदार विजयराव औटी यांच्या मतदारसंघात अदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यात येणार असून यानंतर दुसर्‍या दिवशी या यात्रेची सुरवात सकाळी 10 वाजता होणार आहे. यामध्ये सर्वप्रथम शहरातील माऊली संकुल येथे शिवसेना युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे युवकांच्या प्रश्नांवर उत्तर देणार आहे. युवकांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती विक्रम राठोड यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post