शिवशाही पलटी ; १५ प्रवाशी जखमी


वेब टीम : अहमदनगर
औरंगाबाद महामार्गावरील माळीचिंचोरा फाट्यानजिक पुणे- औरंगाबाद शिवशाहीला अपघात झाला. यात १० ते १५ प्रवाशी जखमी झाले. जखमींना नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माळीचिंचोरा फाट्याजवळ दुपारी ४वाजण्याच्या सुमारास समोरील गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने पुण्याहून औरंगाबादकडे जाणारी शिवशाही बस (एम. एच.०४ जे.के. २८४१) च्या चालकाचा बस वरील ताबा सुटून दुभाजक ओलांडून नगर कडे जाणा-या रस्त्यावर पलटी झाली. नागरिकांनी व पोलिसांनी तात्काळ जखमींना बसच्या बाहेर काढून नेवासा फाटा येथील खाजगी व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती बीट अंमलदार सुनील जरे यांनी दिली. यावेळी महामार्गावर दुतर्फा मोठी गर्दी झाल्याने वाहतूक १ ते २ तास ठप्प झाली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post