'या' प्रसिद्ध अभिनेत्याला झाली अटक


वेब टीम : मुंबई
बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉसमधून आपली ओळख बनवणाऱ्या एजाज खानला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

टिक-टॉकवर त्याने वादग्रस्त व्हिडिओ केल्याने मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही माहिती खुद्द 'द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'चे सहनिर्माते अशोक पंडित यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. अशोक पंडित यांनी एजाज खानच्या आक्षेपार्ह व्हिडिओबाबत एजाज खानवर एफआयआर दाखल केले होते.

अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर एफआयआरचा फोटो पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, 'एजाज खानला त्याच्या वादग्रस्त टिक-टॉक व्हिडिओसाठी अटक केल्याबद्दल आपला आभारी. मी एक तक्रार १६ जुलैला जूहू पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. ते समाजसाठी धोकादायक आहे.'

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post