महापालिकेच्या कार्यालयात थुंकनाऱ्यांना चपराक ; आता होणार दंड आणि गुन्हा दाखल


वेब टीम : अहमदनगर
महापालिकेच्या कार्यालयात पान, तंबाखू, गुटका, मावा खाऊन थुंकल्यास आता २०० रुपये दंड केला जाणार आहे.दंड करूनही पुन्हा पुन्हा असा प्रकार घडल्यास संबंधितांवर सार्वजनिक स्वच्छता कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी प्रशासनाला दिले आहेत. या कारवाईत नगरसेवक असो व अधिकारी, तसेच ठेकेदार, कर्मचारी किंवा नागरिक यापैंकी कोणाचीही गय करू नका असेही आयुक्तांनी बजावले आहे.

महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी उपमहापौर मालन ढोणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.८) दुपारी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट घेवून महापालिका कार्यालयातील अस्वच्छते बाबत निवेदनाद्वारे तक्रार केली.

यामध्ये म्हंटले आहे की, महानगर पालिकेच्या नविन प्रशासकीय इमारती मधिल १ ल्या मजल्यावर सध्या अतिशय अस्वच्छता पसलेली आहे. महिला कर्मचारी व पुरुष 'कर्सचारी यांच्या स्वच्छता गृहाचे दरवाज च्या मध्ये एक लाकडी पार्टेशन टाकलेले असून सदर पार्टेशन जवळ बरेचसे पुरुष कर्मचारी दिवसभर थुंकत असतात. तसेच येणारे जाणारे नागरीक देखिल तेथे थुंकत असतात. त्यामुळे त्याठिकाणी अतिशय घाण साचलेली असून त्याठिकाणी खुप दुर्गंधी सुटलेली आहे. तसेच महिलांना स्वच्छता गृहात जाणे सुद्धा अतिशय कठीण झालेले आहे.सदर बाबत ब-याच वेळा महानगरपालिकेचे हवालदार यांचे कडे तक्रार केलेली आहे. परंतु सदर बाबत काहीही कार्यवाही होत नाही.त्यामुळे महापालिका कार्यालयातील अस्वच्छते बाबत संबंधितांना योग ते आदेश द्यावेत अशी विनंती या महिला कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना केली. त्याची गांभिर्याने दखल घेत आयुक्तांनी महापालिकेच्या कार्यालयात पान, तंबाखू, गुटका, मावा खाऊन थुंकणारास २०० रुपये दंड करण्याचे आदेश दिले आहेत.

या निवेदनावर सौ.सगम एस.एस., आर.व्ही.सस्कर, आर.बी.पाटोळे, वल्लाळ एस.डी., सौ.चंद्रकला खलचे, श्रीमती स्वाती आंदे, केशर जाधव, अनिता लोंढे, जी.एस.धोंगडे, संगीता कोतकर, शितल टिमकारे, सौ.शिरसुळ,सौ.पुंड, श्रीमती अंजली दसरे, वंदना चोथे, मंगल जपकर, मंगल खेडकर, सौ.नंदा वाघमारे, सौ. शेळके रजनी, सौ.नंदा शेजूळ, श्रीमती अनिता घाडगे, श्रीमती वर्षा राणा, व्ही.आर.सारसर, दरंदले एस.एम., सय्यद कय्युम, अमित मिसाळ, कांगुडे बी.एस., सोनवणे डी.आय.,सौ.एस.डी.कुरापाटी, कु.सुलताना शेख, सौ. शाळिग्राम बी.ए., घोलप एस.एल., श्रीमती खोसला के.जे. आदी महिला कर्मचाऱ्यांच्या सह्या होत्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post