एटीएम फोडण्याचा डाव फसला


वेब टीम : अहमदनगर
दिल्ली गेट परिसरातील सातभाई गल्ली येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्याचा डाव शनिवारी मध्ये रात्री फसला.ही घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी संदीप मिटके यांनी तातडीने घटना स्थळी धाव घेतली.

दरम्यान आजच्या आजच्या घटनेमुळे पुन्हा एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेकडे बँका दुर्लक्ष करत असल्याचे दिल्लीगेटच्या घटनेवरून पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. एटीएमच्या सुरक्षिततेसाठी बंदुकधारी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करण्यास बँक प्रशासन उदासीन आहेत. सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरेही अनेकदा चालू नसतात. बँकांच्या या अक्षम्य हलगर्जीमुळे चोरांना चोरी करण्याची आयती संधीच चोरट्यांना मिळत असते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post