एटीएम फोडणारा 'तो' भामटा जेरबंद


वेब टीम : अहमदनगर
दिल्लीगेटजवळील एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत कोतवाली पोलिसांनी सोमवारी बुग्या उर्फ सुरज दिलीप नरवडे यास ताब्यात घेतले.त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

याबाबत सविस्तर असे की, दिल्ली गेट येथील एटीएम मशीन फोडून पळून गेलेला आरोपी हा त्याच्या मित्राला भेटण्यासाठी लालटाकी परिसरात येणार असल्याचे कोतवालीचे पोलिस निरीक्षक विकास वाघ यांना गुप्त खबऱ्याने सांगितले. त्यानुसार पोलिस अधीक्षक इशु सिंधु, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वाघ यांनी त्यांच्या पथकातील पोहेकॉ.दिपक साबळे, पोना.नितीन गाडगे,पोना मुकुंद दुधाळ,पोकॉ.देवा थोरात,पोकॉ.सुरज हिवाळे यांना याबाबत माहिती देवून या परिसरात सापळा लावण्याचे सांगितले. गुप्त बातमीदरााने सांगितल्यानुसार सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास अप्पु हत्ती चौकाकडून जांभळ्या रंगाचा टीशर्ट घातलेला विना नंबरच्या दुचाकीवरून सिध्दार्थनगरकडे जात असताना दिसला. बाजमीदाराने इशारा करताच या परिसरात सापळा लावलेल्या कर्मचाऱ्यांनी झडप घालून त्याला पकडले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव बुग्या उर्फ सुरज दिलीप नरवडे वय २४, रा.तपोवन रोड,संभाजीनगर बंगला.नं१क्लासिक व्हीला रो हौसिंग सोसायटी असे सांगितले.तसेच दिल्लीगेटजवळील एसबीआय बॅकेचे ते एटीएम फोडल्याची कबुली दिली.याबाबत त्याच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post