नगर जिल्ह्यात विखेच सबकुछ, लक्ष देण्याची गरज नाही : चंद्रकांत पाटील


वेब टीम : मुंबई
राधाकृष्ण विखे पाटील भाजपात आल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकांसाठी संगमनेर विधानसभा मतदार संघात आणि नगर जिल्ह्यात मला लक्ष देण्याची गरज नाही. विखे त्यासाठी समर्थ आहेत अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रकांतदादा पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड केली आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी जसे बारामतीवर आपण स्वत: लक्ष केंद्रित केले होते. त्याप्रमाणे संगमनेर विधासभा मतदारसंघावर करणार का ? असे विचारले असता, पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी मी बारामतीवरलक्ष केंद्रित केले होते. राधाकृष्ण विखे हे स्वत: भाजपात आलेले आहेत. तसेच दोन खासदार युतीचे नगर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे संगमनेर अथवा नगर जिल्ह्यात माझी गरज लागणार नाही. विखे त्यासाठी समर्थ आहे असे पाटील यांनी नमूद केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post