महामार्गावर वाहने अडवून लुटमार करणारे आरोपी जेरबंद


वेब टीम : अहमदनगर
महामार्गावर वाहने अडवून लुटमार करणार्‍या दोघांजणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. रमेश सावत्या उर्फ सावंत भोसले (वय 26, रा. पिंपळगाव कौडा ता.नगर) व तुषार सावत्या उर्फ सावंत भोसले (वय 22 रा.सदर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
 पोलिसांकडून मिळेली माहिती अशी की, दि.17 मे रोजी सुमित सावंत (रा.भवानीनगर, सारसनगर,नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा हा रमेश भोसले याने व साथीदारांनी केला आहे, अशी माहिती खबर्‍यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती. सदर त्या गुन्ह्यातील आरोपी कामरगाव येथील आठवडे बाजारामध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कामगारव आठवडे बाजारात सापळा लावून आरोपी रमेश भोसले व तुषार भोसले या दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांकडे चौकशी केली असता, गुन्हा हा आत्मास सावत्या उर्फ सावंत भोसले (रा.पिंपळगाव कौडा, ता.नगर) अशांनी मिळून केल्याची कबुली दिली. यावेळी सदर गुन्ह्यातील चोरलेली 40 हजार रुपये किंमतीची 220 सीसी बजाज पल्सर
मोटारसायकल काढून दिल्याने ती ताब्यात घेतली. आरोपीकडून इतर ठिकाणी कोठे-कोठे गुन्हे केलेले आहेत. याबाबत चौकशी केली असता, त्यांनी सावत्या भोसले याचेसह नगर-पुणे महामार्गावर चार शिवार, कामरगाव शिवार, कामरगाव घाट या परिसरात जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींवर नगर तालुका पोलिस ठाणे 12, सुपा पोलिस ठाण्यात 5 आणि श्रीगोंदा पोलिस ठाण्यात एक अशी गुन्हे आहेत. आरोपी रमेश भोसले व तुषार भोसले या दोघांना मुद्देमालासह नगर तालुका पोलिस ठाण्याकडे  पुढील तपासासाठी ताब्यात दिले आहे.  स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ.सोन्याबापू नानेकर, पोना संदीप पाटील, आण्णा पवार, ज्ञानेश्वर शिंदे, रविंद्र कर्डिले, अशोक गुंजाळ, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते, मन्सूर सय्यद, अरविंद भिंगारदिवे, मनोज गोसावी, सचिन आडबल, प्रकाश वाघ, विनोद मासाळकर व नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोसई शहादेव पालवे, सपोनि.मोहन बोरसे, पोकॉ. संदीप र्खेगट, संदीप आव्हाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post