लघवीला जातो सांगून आरोपीचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न


वेब टीम : अहमदनगर
लघवी जातो असे सांगून कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील शौचालयामध्ये आरोपीने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करत पोलिसांना धमकावत त्यांच्यावरही ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात चांगदेव भारम भोसले (वय ३६ रा. पढेगाव, ता. कोपरगाव) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा व आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद विण्यात  आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की,  मंगळवार (दि.23) दुपारच्या सुमारास कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात  दरोड्याच्या गुन्ह्यातील पोलिस कस्टडी रिमांडमधील आरोपी चांगदेव भारम भोसले यास तपासकामी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात येथे आहे.

त्याने लघवीचा बहाणा करत शौचालयामध्ये जावून स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करून घेतले. तुम्हाला सगळयांना कामाला लावतो, अशी धमकी देऊन पोलिसांशी झटापट केली व त्याच्या हातातील ब्लेडने त्यांच्यावरही वार करण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिसांनी बळाचा वापर करून आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडील ब्लेडही ताब्यात घेतले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post