दाऊदचा 'हा' नातेवाईक मुंबईत अटकेत


वेब टीम : मुंबई
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिजवान कासकर आणि अन्य दोघांना मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. खंडणी प्रकरणी काल रात्री मुंबई विमानतळावर ही कारवाई करण्यात आली.

रिजवान कासकार हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा लहान भाऊ इक्बालचा मुलगा आहे. इक्बाल कासकर अगोदरपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. रिजवान बुधवारी रात्री देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होता त्यावेळी त्याला अटक केली. मुंबई पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या प्रकरणी चौकशी करत असताना मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच अफरोज वडारिया उर्फ अहमद रजा याला अटक केली होती. वडारिया याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी लूक आउट नोटीस जारी केली होती. त्या आधारावर त्याला अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलिसांनी अधिकाऱ्यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post