इलेक्ट्रिक वाहनं आता होणार स्वस्त; केंद्र सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णयवेब टीम : दिल्ली
इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे. देशाच्या वित्तमंत्री मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.इलेक्ट्रिक वाहनांवरील नवा पाच टक्के टॅक्सचा दर एक ऑगस्टपासून लागू होणार आहे.

अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगाला बळ देण्यासाठी सरकारकडून या वाहनांसाठी लागणाऱ्या टक्सवर सूट देणे आणि कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती.  वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून घटवून पाच टक्क्यांवर आणण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
यामध्ये सौरऊर्जा निर्माण करणार्‍या साहित्य आणि सेवेचे मूल्य तसेच वाईंड टर्बाइन प्रकल्पातील कर सवलतीविषयी चर्चा झाली. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटीत कपात करण्याबाबत चर्चा झाली होती. अधिकार्‍यांच्या समितीने सुचवलेले उपाय  बैठकीत समोर ठेवले गेले. देशी ई-वाहनांना चालना देण्यासाठी या वाहनांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणण्याचा विचार केंद्र सरकार करीत होती. सौरऊर्जा प्रकल्पांवरील कररचनेबाबतही यामध्ये विचार करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post