शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन काढायचे -जयदत्त क्षीरसागर


वेब टीम : बीड
मंत्री पदाची संधी ही अंतिम साध्य नाही, तर साधन असल्याचे सांगत शेवटच्या दोन महिन्यात मिळालेल्या या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्नांची परीकाष्टा करत शेतकरी, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्यांसाठी मोठे काम करायचे आहे. ट्वेंटी-२० सामन्यातला हा शेवटचा ओव्हर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रन कसे काढता येतील, माणसं कसे जोडता येतील, समस्या कशा सोडवता येतील याकडे लक्ष देणार असल्याचे रोजगार हमी मंत्री ना. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. ते चौसाळा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीने उभारलेल्या गाळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचीन मुळुक, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे, जगदीश काळे, अरुण डाके, विलास बडगे, गणपत डोईफोडे, अरुण बोंगाणे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
 पुढे बोलताना ना. क्षीरसागर म्हणाले की, वारी फिरल्यावर पाऊस येतो, असं म्हटलं जातं मात्र या वर्षी पाऊस अद्याप आला नाही. मी पंढरीला गेलो, वारीत पायी चाललो, पंगत दिली, विठ्ठलाला ‘पाऊस पडू दे’ म्हणून साकडं घातलं, भारतासह अन्य देशातील वेध शाळांनी २२ तारखेपासून मराठवाडा, विदर्भात पाऊस पडेल, असा अंदाज सांगितला आहे. त्यांचा अंदाज खरा ठरो, मराठवाडा आणि विदर्भाची परिस्थिती सारखीच आहे. दुष्काळाने तुमच्या-आमचे सालटे काढले आहेत. दुष्काळ पाचवीला पुजला आहे. अशा स्थितीत आता मला सत्तेत संधी मिळाली, ही शेवटच्या काळातली संधी ट्वेंटी-२० मॅचमधला हा शेवटचा ओव्हर आहे. बघू किती रन काढता येतात ते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपण शब्द दिला आहे. बीड जिल्हा आणि मराठवाड्यामधील समस्या सोडवण्याचे आणि माणसे जोडण्याचे महिनाभरात भरपूर काम केले आहे. माझा दावा नाही, सगळच काही बदलेल, परंतु नक्कीच शेतकरी, कष्टकरी, कामगारांसाठी मोठे काम सुरू केले आहे. शेततळ्याला वाढीव पैसे मिळत आहेत. ठिबकाचे अनुदान वाढले आहे. या दोन महिन्यात जेवढं काम करता येईल तेवढं करायचं आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता कृत्रीम पावसासाठी औरंगाबाद, सोलापूर, शेगाव येथे स्टेशन केले असून २३ तारखेपासून कृत्रीम पाऊस पाडण्याची प्रक्रिया सुरू होईल. जेथे आभाळ असेल तेथे पाऊस पाडला जाईल

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post