युतीचे निश्चित नाही, तयारीला लागा : भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी.नड्डा यांचे निर्देश


वेब टीम : मुंबई
शिवसेनेसोबत विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार की नाही याचा विचार करत बसू नका. तर आपल्याला सर्व मतदारसंघात काम करायचे आहे. हे लक्षात ठेवा, असा सूचक सल्ला जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या नेते आण पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

जे. पी. नड्डा यांचे काल शनिवारी मुंबईत आगमन झाले. त्यावेळी त्यांनी दादरमध्ये वसंतस्मृती येथे पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी नेत्यांना, पदाधिकाऱ्यांनी सल्ला दिला.
लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये शैथिल्य येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या जोमाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षसंघटनेला कार्यरत करा, असे संदेशही त्यांनी दिला आहे.

प्रत्येक मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख यांना भेटून ते राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत सरकारी योजनांचे लाभ मिळवून देतील याकडे लक्ष द्या असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक आज रविवारी गोरेगाव येथील नेस्को संकूल येथे होत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post