कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकारचा 'द एन्ड'; विश्वासदर्शक ठरवत फेल


वेब टीम : बेंगळुरू
कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी मंगळवारी विश्‍वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करू शकले नाही. परिणामी त्यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडे  मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर सभापती रमेशकुमार यांनी अनिश्‍चित काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. राज्यपालांनी कुमारस्वामी यांचा राजीनामा स्विकारला असून आता सरकार स्थापनेसाठी भाजपची नेमकी काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदान प्रक्रियेत भाजपने विजय मिळवल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी सभागृहात विजयी खूण दाखवत आनंद व्यक्‍त केला. दोन आठवडे विश्‍वासदर्शक ठरावावर भाजपने सभागृहात कोणतीही आक्रमक भूमिका घेतली नव्हती. आमदारांवर निलंबनाची कारवाई होऊ नये, याची खबरदारी बाळगण्यात आली होती. अखेर भाजपने पाळलेला संयम त्यांना विजयपथापर्यंत घेऊन गेला.

कुमारस्वामी हे बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यानंतर येडियुराप्पा यांनी, हा लोकशाहीचा विजय असून लवकरच आवश्यक पावले उचलणार, असल्याचे सांगितले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post