कर्नाटकमध्ये भाजप सरकार, १०६ मतांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव


वेब टीम : बेंगळुरू
सभागृहातील बहुमता अभावी एचडी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. मुख्यमंत्रिपदासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर आज येडियुरप्पा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. १०६ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.

सभापतींनी १७ आमदारांना अपात्र घोषित केल्याने विधानसभेतील संख्याबळ आता २०७ पर्यंत येऊन पोहोचले आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपचे १०५ आमदार आहेत. त्यामुळे त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी १०४ आमदारांची गरज होती. तसेच त्यांच्याकडे एका अपक्ष आमदाराचाही पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांचा मार्ग सोपा झाला आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री कुमारस्वामी पायऊतार झाल्यानंतर विधानसभा सभापती केआर रमेशकुमार यांनी आतापर्यंत काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांना अपात्र घोषित केले आहे. पहिल्यांदा राजीनामा स्वीकारण्यात यावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या आमदारांनी आता अपात्र घोषित केल्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post