अकोलेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


वेब टीम : अहमदनगर
अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभवराव पिचड हे जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य राहील, अशी भावना राष्ट्रवादी काँगेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत विविध कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली.

आ.वैभव पिचड यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक येथील अमृतसागर दूध संघाच्या सभागृहात झाली. उद्या शनिवारी पंकज लॉन्स येथे तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार वैभव पिचड यांचा भाजपा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post