ठरले... नेहरू मार्केटसाठी आराखडा तयार करण्याचे खा. सुजय विखे यांचे निर्देश


वेब टीम : अहमदनगर
9 वर्षापासून प्रलंबीत असलेले नेहरू मार्केट उभारणीच्या प्रश्‍नासंदर्भात चितळेरोड हातगाडी व भाजी विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे खा.सुजय विखे पा. यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, महापौर बाबासाहेब वाकळे व उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांची भेट घेतली. नेहरु मार्केटचा प्रश्‍न तातडीने सोडविण्यासाठी एक समिती नेमून हा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या सुचना केल्या. तर येत्या आठ दिवसात नेहरु मार्केटचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलविण्याचे निर्देश दिले. 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे, नगरसेवक दत्ता कावरे, मा.नगरसेवक अ‍ॅड.धनंजय जाधव, सुभाष लोंढे, राम धोत्रे आदिंसह नेहरु मार्केट जवळील भाजी विक्रेते उपस्थित होते.

नेहरु मार्केट पाडल्यानंतर त्या मोकळ्या मैदानात काही सुविधा नसल्याने नाईलाजास्तव भाजी विक्रते व गाळेधारकांना रस्त्यावर बसून आपला व्यवसाय करावा लागत आहे. यामुळे रस्त्याला अडथळा निर्माण होऊन वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. गेल्या 9 वर्षापासून ओटेधारक व गाळेधारक त्यांच्या व्यवसायाच्या जागेपासून अद्यापि वंचित असल्याचे संजय झिंजे यांनी निदर्शनास आनून दिले.

 तसेच खा. विखे यांनी गोरगरीब ओटेधारक व गाळेधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहरु मार्केट उभारणीसाठी एजन्सीची नेमणुक करुन, त्यांच्याकडून उत्कृष्ट डिझाईन व आराखडा तयार करुन घेण्याचे मनपा आयुक्तांना सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post