पार्थ पवारच्या ड्रायव्हरचे अपहरण.. बेशुद्धावस्थेत सोडले सुपा घाटात


वेब टीम : मुंबई
माजी उपमुख्यमंत्री यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार यांच्या गाडीच्या चालकाचे अपहरण करून सदर चालकाला मारहाण करून त्यास नगर जिल्ह्यातील पारनेरातील सुपा येथील घाटात बेशुद्धावस्थेत सोडून दिले असल्याची घटना घडली. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्थ अजित पवार यांचा चालक मनोज सातपुते याने दिलेल्या फिर्यादीनुसार पार्थ पवार यांच्यासोबत चालक मनोज सातपुते मुंबई येथे गेला होता. 5 जुलै रोजी मनोज काही खासगी कामानिमित्त बाहेर पडला असता एका लाल रंगाच्या ओमनीमध्ये आलेल्या काही इसमांनी मनोज यास ‘तु पार्थ पवार यांचा चालक का आहे का’ अशी विचारणा केली तसेच आम्हाला पार्थ यांना एक वस्तू देण्यासाठी जायचे आहे असा बनाव रचत त्याला गाडीत बसवले. मात्र त्यानंतर 6 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास मनोज शुद्धीवर आला व त्याला जाग आली तेव्हा मनोज हा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरातील सुपा घाटात रस्त्याच्या कडेला पडलेला होता. मनोजचे कपडे फाटलेले तर उजव्या पायाच्या करंगळीतून रक्त येत होते तसेच मनोजचा मोबाईल त्याच्या जवळ नव्हता.

एका एसटीला हात करत मनोज सणसवाडी येथे पोहोचल्यानंतर सदर प्रकरण उघडकीस आले असून शिक्रापूर पोलिसांनी सदर प्रकरणी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post