नगर शहरात महिन्याभरात आयटी कंपन्या - आ.जगताप


वेब टीम : अहमदनगर
शहरातील एमआयडीसीत आयटी कंपन्या आणण्यासाठी आमचे प्रयत्न असून, त्यानुसार कंपन्या बरोबर चर्चा झाली आहे. महिनाभरात आयटी कंपन्या येणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नगरसेवक कुमार वाकळे, विनित पाऊलबुध्दे, प्रकाश भागानगरे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.

आ.जगताप पुढे म्हणाले की,पुण्याबरोबर च नगर मध्ये आयटी कंपन्या येण्यासाठी तयार आहेत. या आयटी पाक म्हणून देशात अहमदनगर ची ओळख होईल. यामुळे नगर शहरातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.46 गोळयांपैकी 40 गाळे विकले गेले आहेत. 7 ते 8 आयटी कंपन्या येणार आहेत. यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे, असे सांगत ते म्हणाले की, मी काही शिवसेनेत जाणार नसल्याचा खुलासा केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post