आ. संग्राम जगतापांचे ठरले, 'या' पक्षाकडून लढविणार विधानसभा


वेब टीम : अहमदनगर
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अरूणकाका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांच्या संदर्भात माध्यमात येणाऱ्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. त्यांनी विधिमंडळ नेते अजित पवार यांची भेट घेउन राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप हे शिवसेना व भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या व राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची अफवाही पसरविण्यात आली होती.

या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी आमदार जगताप पिता-पुत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या संदर्भात आलेल्या बातम्या तथ्यहीन असून, त्यांनी अजित पवार यांची भेट घेउन राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे अंकुश काकडे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post