नगरच्या आयटी पार्कची आ. संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी


वेब टीम : अहमदनगर
शहरातील एमआयडीसीत 19 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या आणि तेव्हापासून धूळखात पडलेल्या आयटी पार्क इमारतीचे रूप गेल्या 8-10 दिवसांत संपूर्णपणे पालटून गेले आहे. ओसाड पडलेल्या या इमारतीला आता  पुणे - मुंबई सारख्या आयटी पार्क चा लुक आला आहे. या सुरु असलेल्या कामाची आ. संग्राम जगताप यांनी पाहणी करीत विविध सूचना केल्या.


पुणे-मुंबई सारख्या आयटी कंपन्या नगर शहरातही सुरु व्हाव्यात, त्यानिमित्ताने नगरच्या तरुणांना शहर सोडून न जाता येथेच चांगला रोजगार उपलब्ध व्हावा या साठी आ. संग्राम जगताप यांचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. त्यांच्या  प्रयत्नांना यश आले असून लवकरच नगर एमआयडीसीमधील आयटी पार्क सुरु होणार आहे. सुरुवातीला 7 - 8 कंपन्या येथे आपले कामकाज सुरु करणार आहेत. त्यासाठी आयटी पार्क इमारतीची व परिसराची डागडुजी करणे आवश्यक होते. आ. संग्राम जगताप यांनी यासाठी पुढाकार घेत कामाला सुरुवात केली. तब्बल 19 वर्षे ओसाड पडलेल्या या इमारतीत जाळ्या, कचर्‍याचे ढीग, धुळीचे साम्राज्य, आग्या मोहोळ, वटवाघळे यांचे घरटे, विविध पक्षांची घरटे तसेच घाणीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झालेले होते. ही सर्व साफसफाई करण्यात आली असून संपूर्ण इमारतीला नव्याने रंग देण्यात आला आहे. लाईट फिटिंग, तुटलेल्या फरशा, स्वच्छ गृहे, यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post