दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन


वेब टीम : दिल्ली
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन झाल्याचं वृत्त नुकतंच हाती येतंय. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच दीर्घआजाराने निधन झाले आहे. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. दिल्लीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्या ८१ वर्षांच्या होत्या.

प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे आज सकाळीच त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली.

शीला दीक्षित या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने फोर्टीस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फोर्टीस एस्कॉर्ट रुग्णालयाचे चेअरमन आणि डॉ. अशोक सेठ यांच्या नेतृत्वाखालील पथक त्यांच्यावर उपचार करत होतं. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत तात्पूरती सुधारणाही झाली होती. मात्र त्यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली, असं फोर्टीस एस्कॉर्ट रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post