वेब टीम : अहमदनगर शिवसेनेने येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठक घेतल्या जात आहे....
शिवसेनेने येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठक घेतल्या जात आहे. जिल्हाप्रमुखासह जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिऱ्याशी स्वतः पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत नगर शहर मतदारसंघातून शिवसेना उपनेते अनिल राठोड व पारनेर मधून विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांची पक्षप्रमुखांकडे ही दोन नावे देण्यात आली आहेत.
भाजपने एकीकडे राज्यात विरोधी पक्षाचे नेते व विद्यमान आमदारांना पक्षची दारे उघडली असतांना दुसरीकडे शिवसेनाही त्याच मार्गावर चालली आहे. या दोन पक्षात विरोधकांचे आमदार व नेते घेण्यासाठी स्पर्धा लागली आहे. जिल्ह्यातही तशी चाचपनी करण्याबाबत मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीसाठी दक्षिण व उत्तरचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रत्येक मतदार संघातील आढावा स्वतंत्र घेण्यात आला. एकीकडे युती पक्की असल्याचे सांगत दुसरीकडे सर्व मतदार संघातील आढावा व संभाव्य उमेदवारांची यादी घेण्यात आल्याने शिवसेनेचे पदाधिकारी ही अचिंब झालेले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यामुळे झालेली धावपळ पाहता शिवसेनेने सावध राहण्याचा पवित्रा घेतल्याचे दिसते. संभाव्य उमेदवारांमध्ये नगर व पारनेर येथून अनुक्रमे शिवसेना पण येथे आणि राठोड व विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांचीच नावे आहेत. तर राहुरी मतदारसंघातून उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांचे नाव देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. श्रीगोंदा, नेवासा व श्रीरामपूरवर लक्ष देण्याची सूचना पक्ष प्रमुखांनी स्थानिक नेत्यांना दिली आहे. श्रीगोंदा व नेवासा मतदारसंघ भाजपाकडे असेल तरी या मतदारसंघावर शिवसेनेचे विशेष लक्ष असणार आहे.