सैन्यात सेवापुर्ती झालेल्या जवानाची गावातून मिरवणुक


वेब टीम : अहमदनगर
आव्हाडवाडी (ता. नगर) येथील जवान रामेश्‍वर रघूनाथ आव्हाड भारतीय सेनेत सेवा पुर्ण करुन परतले असता या सुपुत्राची गावकर्‍यांनी जंगी मिरवणुक काढली. तसेच ग्रामस्थ व जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने सेवापुर्ती कार्यक्रमात रामेश्‍वर आव्हाड यांचा तिरंगा ध्वज देऊन गौरव करण्यात आला.
रामेश्‍वर आव्हाड यांनी भारतीय सेनेत 17 वर्ष सेवा केली. गावी आलेल्या या जवानाची जल्लोषात मिरवणुक काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करुन त्यांचे स्वागत केले. स्वागताने गावी आलेल्या या जवानाचे डोळे पाणावले. ह.भ.प. महेश महाराज हरवणे यांचा किर्तनाचा कार्यक्रम देखील रंगला होता. त्यांनी देखील देश सेवेचे कर्तव्य आपल्या किर्तनातून विशद केले.  यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, निवृत्ती भाबड, विठ्ठल लगड, संभाजी वांढेकर, संतोष शिंदे, ग्रामस्थ महादेव शिरसाठ, गणपत कर्पे, महादेव आव्हाड, मारुती आव्हाड, अंकुश आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, अमोल आव्हाड, अदिनाथ लटपटे, जगन्नाथ आव्हाड, झुंबर गाढवे, जय जावळे, आर्जुन आव्हाड, त्रिंबक आव्हाड, छगण आव्हाड, चांगदेव आव्हाड, नवनाथ आव्हाड आदिंसह आजी-माजी सैनिक, गणेश तरुण मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मातृभूमीची सेवा करुन परतलो आहे. नोकरीची सेवापुर्ती झाली आहे. मात्र देशसेवा अंतिम श्‍वासापर्यंन्त चालूच राहणार आहे.  गावाकडील प्रेम पाहून भारावलो असल्याची भावना रामेश्‍वर आव्हाड यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. शिवाजी पालवे म्हणाले की, प्रत्येक सैनिका सेवापुर्तीनंतर देखील आपल्या परीने देशसेवा सुरुच ठेवत असतो. देशसेवा ही त्याच्या रक्ततात भिनलेली असते. माजी सैनिकांचे संघटन करुन जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनने देखील सामाजिक कार्यात योगदान देऊन देशसेवा चालू ठेवलेली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post