भाजप - सेना जुळे नव्हे 'खुळे' भाऊ ; सत्यजीत तांबे


वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे भाजप-सेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून चढाओढ दिसत आहे. तसेच जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये अद्याप निश्चिती झालेली नाही. याविषयी शिवसेनेचे खासदार यांनी ‘जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपासंदर्भात कोणताही तिढा नाही आणि मुख्यमंत्री पदासाठी कुठलाही वाद नाही. आम्ही जुळ्या भावाप्रमाणे काम करतोय, अस विधान केले आहे.

त्यावरून महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी टीका केली आहे. त्यांनी ‘जुळे नाही , खुळे भाऊ …’ अशा शब्दात भाजप सेनेवर टीका केली आहे.

राज्यात सेना - भाजप यांनी विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी मुख्यमंत्री पदावरून सेना भाजपात दावेदारी सुरूच आहे. यावरून युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी निशाणा साधला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post