सनी लिओनीची आता मराठी चित्रपटात एन्ट्री; 'या' चित्रपटातून पदार्पण


वेब टीम : मुंबई
बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी मराठीत पदार्पण करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत होती. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण सनी लवकरच एका मराठी चित्रपटातून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का देण्यास येत आहे.

बादशहा शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात ‘लैला मै लैला’ या आयटम साँगवर थिरकणारी सनी आता मराठी प्रेक्षकांनाही तिच्या अदांनी घायाळ करणार आहे. आगामी ‘बॉईझ्’ या चित्रपटात ती आयटम साँगवर डान्स करताना दिसणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती स्वतः गायक अवधूत गुप्ते यानेच दिली आहे. अवधूत म्हणाला की, ‘आमच्या चित्रपटात सनी एक आयटम नंबर करत आहे. आम्हाला या चित्रपटाद्वारे मराठीत कधीच झाले नाही असे काही तरी करून दाखवायचे होते. त्यामुळे बॉलिवूडमधील सुप्रसिध्द चेहऱ्याचा यात उपयोग करून घ्यायचे आम्ही ठरवले. यासाठी निर्माता राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि त्यासाठी ते कायम सनीच्या संपर्कातही होते. चित्रपटातील सनीच्या सहभागाने आम्हाला खूप आनंद झाला आहे.’

या आयटम साँगचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. सुनिधी चौहानने गायलेल्या या आयटम साँगचे संगीत दिग्दर्शन अवधूत गुप्ते यानेच केले आहे. तर हिंदीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केलेय.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post