आंदोलन म्हणजे शिवसेनेची नौटंकी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. थोरातांची टीका


वेब टीम : मुंबई
शिवसेना राज्याच्या आणि केंद्राच्या मंत्रिमंडळात सहभागी आहे. पीक विम्याबाबत शिवसेनेने केलेले आंदोलन हे शेतकरी व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारे असून हे फक्त नाटक असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

सध्या राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकर्‍यांना पेरणी सुरु करावयाची आहे. बँका पीक कर्ज देत नाहीत. बियाणांसाठी शेतकर्‍यांकडे पैसा नाही. त्यावर सरकारने मार्ग शोधला पाहिजे. या प्रश्नी आम्ही विधानसभेतही आवाज उठवला होता. केंद्र व राज्य सरकारने विम्याचा प्रिमियमसुद्धा भरला नाही.

या सर्व दिरंगाईमुळे खाजगी कंपन्यांना फायदा मिळत आहे. शेतकरी अडचणीत असताना मंत्री व सरकार काय काम करते, असा सवालही त्यांनी केला.

सरकारवर टीका करायची आणि पुन्हा एकत्र बसायचे, ही सेनेची नाटकबाजी आहे. आता या भूलथापांना जनता बळी पडणार नाही, असे थोरात म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post