'टिक टॉक'साठी रस्त्यावर व्हिडिओ करणे पडले महागात


वेब टीम : अहमदनगर
'टिक टॉक'वर टाकण्यासाठी रस्त्यावर स्टंट करून व्हिडिओ तयार करणे, काही युवकांच्या अंगलट आले आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मिस्किन मळा परिसरात अशा चार ते पाच युवकांवर कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.

सध्या सोशल मीडियात युवकांमध्ये 'टिकटॉक'चे आकर्षण भलतेच वाढले आहे. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अथवा रस्त्यांवर विविध ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओ तयार करून ते ॲपवर अपलोड करण्यासाठी युवकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. यातून काही अप्रिय घटनाही घडलेल्या आहेत. मिस्कीन मळा, गंगा उद्यान परिसरात अशाच पद्धतीने रस्त्यावर व्हिडीओ तयार करण्याचा प्रयत्न एका टोळक्‍याकडून सुरू होता. नागरिकांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी यापैकी काही युवकांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post