राष्ट्रवादीच्या चित्रा वाघही भाजपच्या वाटेवर?


वेब टीम ; मुंबई
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आले आहे.

वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहिती नुसार येत्या ३० जुलैला चित्रा वाघ या भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता याचदरम्यान राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आले आहे.

येत्या ३० जुलैला चित्रा वाघ या भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती वृत्तवाहिनिंनी दिली आहे. इतकेच नव्हे तर चित्रा वाघ यांच्या सोबतच बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, माढाचे आमदार बबन शिंदे, कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे समवेत १० आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post