बंगालमध्ये खळबळ ; १०७ आमदार करणार भाजप प्रवेश


वेब टीम : कोलकाता
पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांचे १०७ आमदार लवकरच भाजपात दाखल होणार आहेत, असा खळबळजनक दावा भाजपा नेते मुकुल रॉय यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

यामध्ये तृणमुल काँग्रेस, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या आमदारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

मुकुल रॉय म्हणाले, भाजपात दाखल होणाऱ्या या विरोधी पक्षातील आमदारांची आमच्याकडे यादी देखील तयार असून ते आमच्या संपर्कात आहेत. सध्या कर्नाटक आणि गोव्यामध्ये भाजपाने विरोधी पक्षांच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याची खेळी केली आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांतील राजकीय परिस्थितीत प्रचंड उलथापालथ झाली आहे.

यानंतर मध्य प्रदेश आणि राजस्थानातही भाजपा अशीच खेळी खेळणार असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी माध्यमांमधून सुरु होते. त्यानंतर आता पश्चिम बंगालमधून हे नवे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post