मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा नाहीतर तीव्र आंदोलन - राष्ट्रवादीचा मनपाला इशारा


वेब टीम :अहमदनगर
शहर परिसरात मागील दोन-तिन वर्षापासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून हे कुत्रे आता हिंस्त्र बनू लागले आहेत. अशाच हिंस्त्र बनलेल्या कुत्र्यांच्या टोळीने शहरातील वेगवेगळ्या भागात शालेय विद्यार्थी, महिला-पुरुष व जेष्ठ नागरिक यांच्यावरही हल्ले केलेले आहेत. या मोकाट कुत्र्यामुळे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. महापालिकेने या मोकाट कुत्र्यांचा व् मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेड़ले जाईल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

मोकाट कुत्र्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिकेमध्ये निवेदन दिले व आंदोलने केली. परंतु महापालिकेच्या वतीने मोकाट कुत्र्यासंदर्भात कुठलाही निर्णय आत्तापर्यंत झाला नाही. महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नगरशहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत पसरली आहे. बालकांवर मोकाट कुत्र्यांची टोळी हल्ला करत आहे. सर्जेपुरा येथील एका बालकाचा मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. या सर्व गोष्टीला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. भविष्यकाळात शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. प्रशासनाने मोकाट कुत्र्या संदर्भात कुठल्या उपाययोजना केलेल्या आहेत, हे नगरकरांना सांगावे. तसेच शहरातील अनेक भागात सुमारे ५०० मोकाट कुत्र्यांचा सध्या मुकत संचार सुरु आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर या मोकाट कुत्र्यांची दहशत असते. तरीही महापालिकेकडून कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे अशा घटना  वारंवार घडू लागल्या आहेत. तरी प्रशासनाने आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडून नगरशहरातील नागरिकांना मोकाट कु्र्यांपासून सुरक्षित ठेवावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, प्रा,माणिकराव विधाते, नगरसेवक संपत बारस्कर, कुमार वाकळे, विनीत पाऊलबुद्धे, दीपालीताई बारस्कर, अजिंक्य बोरकर, सुनील त्रिंबके बाळासाहेब बारस्कर, बाळासाहेब पवार आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post