अवैधरित्या गॅस टाक्या विक्री; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त


वेब टीम : अहमदनगर
शहरातील मुकुंदनगर, पदमनगर, गुलमोहोररोड या ठिकाणी घरगुती वापरातील भारत पेट्रोलियम गॅस, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन गॅस या गॅस टाक्या अवैधरित्या विक्री करणार्‍या चार ठिकाणी छापा टाकण्यात आला. यात तिनजणांना पकडण्यात आले असून, 2 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विजय बुमन्ना पोतघंटे (वय 43, रा.गौरवनगर, मुकुंदनगर), भास्कर एकनाथ जोशी (वय 50, रा. पाईपलाईनरोड,अ.नगर) व शहारुख निसार शेख (वय 24, रा.गुलमोहोर रोड भिंगारदिवे मळा,अ.नगर) अन्य एकजण पळून गेला. स्थानिक गुन्हे शाखा व पुरवठा अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
 याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर शहरातील मुकुंदनगर, पदमनगर, गुलमोहोररोड या ठिकाणी घरगुती वापरातील भारत पेट्रोलियम गॅस, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन गॅस टॉक्या बेकायदेशीर साठवणूक करून अवैधरित्या बाळगून विक्री केली जाते, अशी माहिती   मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी व अन्न धान्य वितरण अधिकारी किरण सावंत पाटील आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकांनी सरकारी वाहनांने दोन पंचासह संबंधित ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या पथकांनी सकाळी 10 ते 3 वाजण्याच्या कालावधीत छापे टाकण्यात आले. यावेळी घटनास्थळावरून विजय पोतघंटे, भास्कर जोशी व शहरुख शेख या तीनजणांना ताब्यात घेण्यात आले. परंतु सराफराज अब्दुल कादर सय्यद (रा.मुकुंदनगर,नगर) हा  एकजण फरार झाला. यावेळी विविध कंपन्यांच्या 59 गॅस टाक्या, 2 इलेक्ट्रीक मोटार असा एकूण 2 लाख 34 हजार किंमतीचा माल जप्त केला.
पुरवठा निरीक्षक घनश्याम गवळी यांनी दोन पंचासमक्ष पंचनामा केला. जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पुरवठा निरीक्षक जंयत भिंगारदिवे यांनी तोफखाना पोलिस ठाणे व भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात जीवनवाश्यक वस्तू अधिनियम 1955 चे का.क. 3,7 प्रमाणे फिर्याद दिली.   

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post