लोकसभेतील पराभवास मी जबाबदार नाही; दानवेंचे खैरेंना प्रत्त्युत्तर


वेब टीम : औरंगाबाद
लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये झालेल्या पराभवाचे खापर भाजप व माझ्या नावे फोडले जात आहे, पण त्यात तथ्य नाही. विजयाचे वाटेकरी सर्व होतात, पण पराभवाचे खापर एकाच्या माथी फोडले जाते. निवडणुकीदरम्यान मी आजारी असल्याने दवाखान्यात होतो. मला माझ्याच मतदारसंघात प्रचारासाठी फिरता आले नाही. त्यामुळे औरंगाबाद लाेकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर त्यांनी माझ्या माथी फोडू नये, असे माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या टीकेला नाव न घेता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्त्युत्तर दिले.

फुलंब्री नगरपंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित मंत्री महोदयांच्या नागरी सत्काराचे औचित्य साधून फुलंब्री शहरात ५ कोटी १८ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी रावसाहेब दानवे बोलत होते. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अतुल सावे, म्हाडाचे अध्यक्ष संजय केनेकर, मराठवाडा वैज्ञानिक महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, उपनगराध्यक्षा इंदूबाई मिसाळ, शिवसेनेचे माजी जि. प. अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष दामू अण्णा नवपुते, पंचायत समितीचे सभापती सर्जेराव मेटे, उपसभापती एकनाथ धटिंग, देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates