शेतकरी सुखी, तर प्रशासन सुखी - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी


वेब टीम : अहमदनगर
शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. आपमही शेतकर्याची मुलं आहोत. ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे. देशाची प्रगती ही शेतकर्यांवर अवलंबून आहे. शेतकरी जेव्हा सुखी राहिले, तेव्हा प्रशासन सुखी राहिले. देश सुखी होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

नगर शहरातील मार्केट यार्ड येथे कानिफनाथ अॅग्रो सर्व्हिस या शेतकरी मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, अॅड. बाळ ज. बोठे पाटील, वन अधिकारी आदर्श रेड्डी, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे, केंद्राचे संचालक पंडित लोणारे, शोभा लोणारे, प्रभाकर तापकीर, सविता भगत, संग्राम भिंगारदिवे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, सतीश शिरसाठ, किरण मोरे, रघुनाथ जाधव, विजय गव्हाणे, डॉ. शंकर वंजारी, सखाराम जाधव, विकास पवार आदींसह शेतकरी व कृषी कर्मचारी उपस्थित होते.

श्री. द्विवेदी पुढे म्हणाले की, शेतकर्यांच्या मार्गदर्शनाखाली व मदतीसाठी अशा खासगी केंद्राची गरज आहे. एकाच ठिकाणी सर्व योजनांची माहिती व मार्गदर्शन शेतकर्यांना मिळणार आहे. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. पंडित लोणारे यांनी आपली सेवा कृषी विभागात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून केली आहे. त्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. निश्चितच त्याचा फायदा शेतकर्यांना होणार आहे. शेतकर्यांनीही याचा फायदा घेतला पाहिजे. शेतकरी येथे प्रसन्न होऊन जातील, असे ते म्हणाले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील म्हणाले की, कानिफनाथ अॅग्रो सर्व्हिस हे शेतकर्यांचे हिताचे व विकासाचे माध्यम निर्माण झाले आहे. शेतकर्याला याचा फायदा निश्चित होणार आहे. शेतकर्याला सक्षम बनविण्याचे हे केंद्र मैलाचा दगड बनेल, असे ते म्हणाले.

केंद्राचे संचालक माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे म्हणाले की, शासनाच्या प्रत्येक योजना या आता ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे तळागाळातील शेतकर्यांना त्याचा लाभ मिळत नाही. तो त्यापासून वंचित राहतो. शेतकरायाला कृषी आणि कृषी संलग्न योजना या एकाच ठिकाणी मिळणार असून, या ठिकाणी पिकाच्या लागवडीपासून ते विक्रीपर्यंतचे मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्व योजनांचे ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरून दिले जाणार असून, कोणताही शेतकरी योजनांपासून वंचित राहणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाईल, असे ते म्हणाले.

यावेळी वन अधिकारी आदर्श रेड्डी, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, अॅड. बाळ ज. बोठे पाटील, विलास नलगे यांनी आपले मनोगत व्यक्त करून केंद्रास शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post