१५ सप्टेंबरदरम्यान राज्यात आचारसंहिता : गिरीश महाजन


वेब टीम : नाशिक
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज(14 जुलै) नाशिकमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला. "येत्या 10 किंवा 15 सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू शकते. त्यानुसार यंदा 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल." असा अंदाज गिरीश महाजनांनी व्यक्त केला.

नाशिकमध्ये आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच गिरीश महाजन यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे, खासदार भारती पवार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखेचा हा अंदाज व्यक्त केला. दरम्यान काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही विधानसभा निवडणुकीच्या तारखेबाबत अंदाज व्यक्त केला होता. "येत्या 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे यंदा 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले होते." त्यानंतर आता गिरीश महाजन यांनीही 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल, असे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post