शेती अवजारे खरेदीसाठी मिळणार अनुदान


वेब टीम : अहमदनगर
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांच्या उन्नतीसाठी ‘उन्नत शेती - समृद्ध शेतकरी’ अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या अभियानांतर्गत यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी एमआयडीसीतील प्रगती शेतकरी अवजारे यांना अनुदान तत्त्वावर शेतकर्यांना अवजारे विक्रीची शासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

शासनाच्या माध्यमातून दरवर्षी शेतकर्यांकडून यांत्रिकीकरणासाठी अर्ज मागविले जातात. त्याची सोडत काढून ज्येष्ठता क्रमांकानुसार त्यांना अनुदान वाटप केले जाते. त्यानुसार शेतकर्यांना अवजारे खरेदी करता यावीत, यासाठी ’प्रगती‘ला मान्यता देण्यात आलेली आहे. शेतकर्यांनी या ठिकाणी अवजारे खरेदी करावीत. शेतकर्यांना अनुदान तत्वाव्यतिरिक्त वाजवी दरात व दर्जेदार अवजारे खरेदीची संधी ‘प्रगती’ने उपलब्ध करून दिली आहे. मागील 25 वर्षापासून या क्षेत्रात ते कार्यरत आहेत.

प्रगतीची सर्व उत्पादने माफक किंमत, उत्कृष्ट क्वालिटी, मजबूत व टिकाऊ असल्याने राहुरी कृषी विद्यापीठाकडून टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता अॅटोमॅटिक पेरणी यंत्र, डबल पलटी नांगर, अॅडजेस्टेबल कल्टीव्हेटर, रोटाव्हेटर या सर्व ट्रॅक्टर अवजारांच्या खरेदीवर शासकीय सबसिडी उपलब्ध होणार असल्याने त्याचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रगती शेती अवजारांचे संचालक अशोक ठोंबरे यांनी केेले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post