प्रियांका @३७; मियामीत केले सेलिब्रेशन!


वेब टीम : मियामी
‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने आपला 37 वा वाढदिवसही मियामी येथे आपल्या सासरच्या आणि माहेरच्या कुटुंबीयांसमवेत साजरा केला. यावेळी तिची चुलत बहीण आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा तसेच आई मधू चोप्राही उपस्थित होत्या.

या सेलिब्रेशनची अनेक छायाचित्रे आणि व्हिडीओ समोर आले आहेत. प्रियांकाने यावेळी चमकदार गडद लाल रंगाचा पोषाख परिधान केला होता. तिने ‘बर्थ-डे गर्ल’चा हेड गियरही घातला होता. उंचच उंच असा केक कापून तिने आपला पती आणि अमेरिकन पॉप स्टार निक जोनास याच्यासमवेत वाढदिवस साजरा केला. या सर्व बर्थ-डे सोहळ्याचे नियोजन स्वतः निकनेच केले होते.

दरम्यान, प्रियांका आता ‘द स्काय इज पिंक’ या हिंदी चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. तिने ‘जय गंगाजल’ या चित्रपटानंतर बॉलीवूडचा चित्रपट केला नव्हता. ‘द स्काय इज पिंक’चे दिग्दर्शन शोनाली बोसने के लेअसून, यामध्ये प्रियांकाबरोबर झायरा वसीम आणि फरहान अख्तर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post