माझी राजकीय कारकीर्द संपविण्याचा डाव ; नगरसेवक समद खान


वेब टीम : अहमदनगर
खोट्या गुन्ह्याच्या तक्रारीचा आधार घेऊन मला व माझ्या कुटुंबीयांवर मोक्का कायद्यातंर्गत पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत नगरसेवक समद खान यांनी अप्पर पोलीस अधिक्षक सागरनेताजी पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर खरे-खोटे पुढे येण्यासाठी आमच्या दोघांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली. यावेळी आ. संग्राम जगताप, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, गणेश भोसले, आरिफ शेख, अजिंक्य बोरकर, वाहिद हुंडेकरी, अ‍ॅड.प्रसन्ना जोशी, साहेबान जहागीरदार आदि उपस्थित होते.

नगरसेवक समद खान यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सन 2015 पासून अर्शद शेख त्यांच्या हस्तका मार्फत माझी राजकीय कारकिर्द संपविण्याच्या हेतूने अनेक खोटे गुन्हे दाखल करीत आहे. सन 2015 ते जानेवारी 2019 दरम्यान माझ्यावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दाखल असलेल्या काही खोट्या केसेसच्या आधारे अर्शद शेख मला व माझ्या कुटुंबीयांवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी करीत आहे. सदर व्यक्ती व त्याच्या हस्तमा मार्फत माझ्यावर तसेच कुटूंबीयांवर खोटे गुन्हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेख यांचे नातेवाईक पोलीस खात्यात असल्याने याचा गैरफायदा फायदा घेऊन पुर्वनियोजितपणे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सन 2015 ते जानेवारी 2019 पर्यंत माझ्यावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यातील घटनास्थळी मी उपस्थितच नसल्याचे सीसीटीव्ही फुटेज संबंधित पोलिस अधिकार्‍यांना देऊन देखील माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यापुढे खोटे गुन्हे दाखल होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य प्रकारे शहानिशा करुन कारवाई करावी.

शेख विनाकारण अंडा गँगशी माझा संबंध जोडत असून, पोलीस प्रशासनाने आमच्या दोघांची नार्को चाचणी करुन सत्य उघडकीस आनावे. तर गुप्त विभागा मार्फत अंडा गँगचे खरेच अस्तित्व आहे का? असल्यास त्याचा म्होरक्या कोण आहे? याची खात्री करण्याची नगरसेवक समद खान यांनी स्पष्ट केले आहे. अर्शद शेख करीत असलेल्या बिनबुडाच्या आरोपामुळे माझे जीवन जगणे कठिण झाले असून, शेख यांच्या जवळच्या व्यक्तींना काही वर्षापुर्वी एटीएसच्या पथकाने तुरुंगात टाकले होते. शेख हे वारंवार परदेशात दौरे करीत असून, त्यांचा सिमीसह इतर परदेशातील अवैध संघटनांशी हितसंबंध आहे का? याची देखील सखोल चौकशी करण्याची मागणी खान यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post