भाजपचे खा. सुजय विखे, राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप 'या' कामासाठी आले एकत्र


वेब टीम : अहमदनगर
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे भाजपचे खा. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप हे शनिवारी एकाच व्यासपीठावर आले होते. दोघांना एकत्र पाहून कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले.

निमित्त होते ते अहमदनगर महापालिकेच्या  पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल लकी डॉ सोडतीचे. या सोडतीचा शुभारंभ खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आ संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ताई ढोणे, आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त प्रदीप पठारे, व नगरसेवक आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतके दिवस एकमेकांच्या विरोधात सोशल मीडियावर रान उठविणाऱ्या दोघांच्याही कार्यकर्त्यांनी दोघांना एकत्र पाहून मात्र विकासासाठी एकत्र आलेच पाहिजे असा सूर व्यक्त केला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post