World Cup 2019 | ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सनी धुव्वा, 27 वर्षानंतर इंग्लंडची फायनलमध्ये धडक


वेब टीम : इंग्लंड
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. तब्बल 27 वर्षानंतर इंग्लंडने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. तर विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची इंग्लंडची आजवरची ही चौथी वेळ ठरली. त्यामुळे आता रविवारी लॉर्डसवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड अशी अंतिम लढत रंगणार आहे.

बर्मिंगहॅममधील आजच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 224 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडने या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करताना 33 व्या षटकातच आठ विकेट्स राखून विजय साजरा केला.

सलामीवीर जेसन रॉयची 65 चेंडूत 85 धावांची खेळी इंग्लंडच्या विजयात निर्णायक ठरली. रॉयच्या या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. जॉनी बेरस्टॉने 34, जो रुटने 49 आणि ऑइन मॉर्गनने 45 धावांची साथ दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post