24 हजार रुपयापेक्षा कमी वेतन असल्याची तक्रार आल्यास त्या कंपनीविरोधात कारवाई होणार


वेब टीम : दिल्ली
केंद्र सरकारच्या आदेशानंतर खाजगी कंपनीत काम करणा-या कर्मचा-याचं वेतन आता हे 24 हजार रुपये प्रति महिना पेक्षा कमी नसेल.

जर कोणतेही खाजगी कंपनी आपल्या कंपनीतील कर्मचा-यांना  24 हजार रुपयापेक्षा कमी वेतन दिलं जातं असेल तर तक्रार केल्यानंतर सरकार त्या संबधित कंपनीविरोधात कारवाई करणार आहे.

सरकारच्या या निर्णयानंतर खाजगी कंपनीत कमी वेतन देणा-या कंपान्यांना चाप बसणार आहे. जर एखाद्या कर्मचा-याला 24 पेक्षा कमी वेतन दिलं जात असेल तर तो कर्मचारी नियुक्त केलेल्या सरकारी अधिका-यांकडे आपली तक्रार करु शकतो.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत म्हटले की कर्मचा-यांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला देणे आवश्यक आहे. आणि ज्या खाजगी कंपन्या विरोधात तक्रार येईल त्या कंपनीची आवश्यक ती चौकशी करुन  योग्य ती कारवाई केली जाईल.


केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत एका प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले की, मोदी सरकारने 2017 मध्ये किमान वेतन कायदा सुधारला आणि 65 वर्षांनंतर हे घडले. किमान वेतन 40 टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. हे 18 हजार वरुन आता 24 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे.

यासाठी कायदा करण्यात आला आहे. ज्यांनी या कायद्याचे पालन केले नाही. त्यांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर त्यांची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post